Rahit Pawar News: 'तुम्ही आधी तुमची भांडणं मिटवा'; संतप्त विद्यार्थी भरकार्यक्रमात रोहित पवारांना काय बोलून गेला, नेमकं काय घडलं?

Rahit Pawar News: आमदार रोहित पवार यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी प्रांगणामध्ये संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.
Rahit Pawar News
Rahit Pawar NewsSaam tv
Published On

Rohit Pawar News: आमदार रोहित पवार यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी प्रांगणामध्ये संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. मात्र त्यातील एक संतप्त विद्यार्थ्याने उठून साहेब अगोदर तुम्ही तुमची भांडण मिटवा, तुमची भांडणं जोपर्यंत मिटणार नाहीत. तोपर्यंत आमचा विचार कोणीच करणार नाही, अशी तक्रार केली. यावर समजूत घालत त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला रोहित पवार यांनी उत्तर दिलं. (Latest Marathi News)

आमदार रोहित पवार विद्यार्थ्याला उत्तर देताना म्हटले की, 'मला सांग , तुला भाऊ आहे का, एकुलता एक असल्याने तू असं बोलत आहे. हे असं काही नसतं. तुम्ही जे बोलत आहात, त्याबद्दल तुम्हाला अनुभव नाही. आमच्यात झालेल्या भांडणामुळे काही लोक सत्तेत गेले आहेत, ती सोडवण्यासाठी तुम्ही सोबत या'.

Rahit Pawar News
Maharashtra Politics: शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला पण...

रोहित पवार उत्तर देताना काय म्हणाले?

'तुमची मदत घेतो. तुम्ही त्यांच्याशी बोला. सत्तेची भांडण आणि सत्तेसाठी भांडणं. यामुळे काही लोक सत्तेत सामील झाले आहेत. आम्ही विचारांशी लढणारी माणसं सत्ता सोडून इथं राहिलो आहेत. आपल्यासाठी विचार महत्वाचा आहे. त्याचप्रकारे तुमच्यासाठी आई-वडिलांचा विचार महत्वाचा आहे. पोलीस,सैनिक यांसारख्या नोकरीसाठी झटत आहात. त्याचप्रमाणे आम्ही विचारांसाठी लढत आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

रोहित पवारांचं राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य

राज्यातील नोकरी आणि विविध मुद्द्यांवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'माझी समाजकारण आणि राजकारणाची स्टाईल वेगळी आहे. मी स्वतः च्या पसंतीने राजकारण या क्षेत्रात आलोय, राजकारणात प्रॅक्टिकल स्टाईल महत्वाची आहे. सत्तेत असताना आम्ही येत नाही असे तुम्ही म्हणाला. मात्र, सत्ता मिळाली त्यातील अडीच पैकी दोन वर्ष कोरोनात गेले'.

Rahit Pawar News
Raj Thackeray Speech: भरसभेत राज ठाकरेंनी केली अजित पवारांची नक्कल; खड्ड्यावरून भाजपवरही साधला निशाणा

अधिवेशनात काही जण कविता करतात...; रोहित पवार

'अडीच लाख नोकऱ्या आहेत आणि २२लाख विद्यार्थी आहेत. आज घडीला अडीच लाखांच्या सर्व भरती जरी केल्या तरी ऊर्वरित भरतीचं काय? बी प्लॅन करायला हवे, असेही ते म्हणाले.

'अधिवेशनात काही जण कविता, शेरोशायरी करतात, आम्ही हात वर करून थकतो. आम्ही अशावेळी राजकारणात आलो की, गेल्या 40 वर्षात ज्या गोष्टी घडल्या नाहीत. त्या या चार वर्षात घडल्या, असेही पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com