Dombivli water crisis : डोंबिवलीत पाणीबाणी! १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागाला बसणार फटका?

Dombivli water supply shutdown : कल्याण-डोंबिवली पालिकेने डोंबिवली पूर्व भागासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुख्य जलवाहिनीच्या तातडीच्या कामामुळे सलग १६ तास पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.
Dombivli water supply shutdown
Dombivli water supply shutdownsaam tv
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनीधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) वतीने नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला होणारा पाणीपुरवठा मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सलग १६ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीवर निर्माण झालेली गळती तातडीने दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुख्य जलवाहिनीला गळती आणि दुरुस्तीचे काम

केडीएमसीच्या १५० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राद्वारे डोंबिवली पूर्व विभागाला पाणी पुरवले जाते. याच पुरवठा करणाऱ्या ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला परिवहन डेपोच्या बाजूला मोठी गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे.

Dombivli water supply shutdown
Nagpur : नागपूर जिल्ह्यात खळबळ! रस्त्यालगतच्या पुलाखाली 102 काडतुसे, पोलिसांकडून कसून तपास सुरू

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही गळती थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. या निर्धारित १६ तासांच्या कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहील.

नागरिकांची गैरसोय टळण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार असल्यामुळे डोंबिवली पूर्व परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. ऐन मंगळवारच्या दिवशी नळाला पाणी येणार नसल्याने दैनंदिन व्यवहारांवर आणि कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी नागरिकांनी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Dombivli water supply shutdown
महाराष्ट्र हादरला! राज्यातील ८ पेक्षा जास्त न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने खळबळ

महापालिकेने सर्व संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी म्हणजेच सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, जेणेकरून टंचाईच्या काळात पाण्याचा साठा पुरेशा प्रमाणात पुरेल. महापालिकेचे पथक वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून, नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.