डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक; डॉक्टरांना मारहाण करणं पडलं महागात

Shiv Sena Corporator Arrested : डोंबिवली येथील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
Shiv Sena Corporator Arrested
SHINDE FACTION COUNCILLOR RAMESH MHATRE ARRESTED IN DOCTOR ASSAULT CASE AT KDMC HOSPITAL
Published On
Summary
  • प्रसिद्ध अमेरिकन फिटनेस युट्युबर कॉनर मर्फी यांचा थायलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला.

  • समूत प्रकान प्रांतातील एका तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला.

  • कॉनर मर्फी हे बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस क्षेत्रातील लोकप्रिय सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व होते.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्स मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती. डॉक्टरांना लोकप्रतिनिधी मारहाण करु लागले तर डॉक्टरांनी काम कसे करायचे असे म्हणत विरोधकांनी विधीमंडळात सरकारला घेरलं होतं.

Shiv Sena Corporator Arrested
सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको ते केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

विरोधकांच्या टीकेनंतर रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Shiv Sena Corporator Arrested
Akola Crime : बायकोची हत्या करून नवरा फरार, ३५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या तिघांवर सरकारी कामकाजात अडथळा आणणे, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकराची कलमे लावण्यात आली आहेत. या तिघांना विष्णू नगर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांच्यासह नगरसेवकालाही अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या नवजात बाळाला उपचारासाठी NICU बेडची गरज होती. रुग्णालयातील सर्व बेड पूर्ण भरले होते. ऑन-ड्यूटी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि आरोपींनी डॉक्टरांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com