MLA Raju Patil Statement: शिंदे गटाचा पदाधिकारी हप्ते घेतो म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; मनसे आमदाराचा आरोप

Dombivali News शिंदे गटाचा पदाधिकारी हप्ते घेतो म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; मनसे आमदाराचा आरोप
MLA Raju Patil
MLA Raju PatilSaam tv
Published On

अभिजित देशमुख
डोंबिवली
: डोंबिवलीतील शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, म्हणून डोंबिवलीतील (Dombivali) फेरीवाल्यांची समस्या सूटत नाही. पोलिसांनी पूरावा मागितला. तर आम्ही पुरावे देऊ; असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केला आहे. (Breaking Marathi News)

MLA Raju Patil
Navapur News: हमालाची धमाल; नगरपालिका करत नाही ते काम चक्क करतोय हमाल

ठाकुर्ली चोळेगाव येथे मनसे कार्यलयाचे उदघाटन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू पाटील यांनी फेरीवाला समस्याबाबत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. काही दिवसापूर्वी डोंबिवली स्टेशन परिसरात नामवंत लोकांचे चित्र साकारात सुशोभीकरण करण्यात आलेल्या भिंतीवर फेरीवाल्यानी अतिक्रमन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर काही नेत्यांनी टीका टिप्पणी केली. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टिका केली आहे.

MLA Raju Patil
Nashik Cyber Police: नाशिक पोलीस थांबवणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटना; काय आहे नवा प्लॅन

तर खरी परिस्थिती सांगणार 

पत्रकारांच्या प्रश्नाला (MNS) उत्तर देताना आमदार राजू पाटील यांनी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत हायकोर्टाकडून केडीएमसी आयुक्तांना नोटिस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खड्डयामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जे दोन वकील रस्त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहे. मला बोलविले तर त्यांना मी खरी परिस्थिती सांगणार असल्याचे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले. 

MLA Raju Patil
Sambhajinagar News : नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाचे धक्कादायक कृत्य: वडिलांची पोलिसात तक्रार

विरोधात बोलले तर मारहाण होते 

राहूल गांधी यांनी फ्लाईंग किस केल्याचा आरोप होत आहे. त्यांनी असे काही केले आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी मणिपूरचा जो मुद्दा उचलला याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.  त्यावर कोणी काही बोलले नाही. पत्रकार मारहाण प्रकरणात राजू पाटील यांनी पक्षात जो कोणी येत नाही. त्यावर दबाव टाकला जातो. पूर्वीचे सरकार असो किंवा आत्ताचे सरकार एक दडपशाही सुरु आहे. पक्षाच्या विरोधात बोलतो त्याला मारहाण केली जाते. आत्ता तर पत्रकारालाही मारहाण केली जात आहे. पत्रकारांनी जागे होऊन त्या पत्रकाराला न्याय दिला पाहिजे असे पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com