Nashik Cyber Police: नाशिक पोलीस थांबवणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटना; काय आहे नवा प्लॅन

Nashik News : नाशिक पोलीस थांबवणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटना; काय आहे नवा प्लॅन
Nashik Cyber Police
Nashik Cyber PoliceSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: मागच्या काही महिन्यांपासून सायबर क्राईम अर्थात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात (Nashik) वाढले आहेत. या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी (Cyber Crime) सायबर दूत काम करणार असून नाशिक पोलिसांनी हि योजना आखत ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखणार आहे. (Live Marathi News)

Nashik Cyber Police
Viral Photo Collector: फोटो एडिट करून झाला नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी; स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाचा प्रताप

नाशिकमध्ये अगदी हजार रुपये पासून ते लाखो रुपयांपर्यंत ऑनलाईन फसवणुकीच्या घटना आत्तापर्यंत उघडकीस आले आहेत. याच घटना रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस सायबर दुत ही योजना राबवणार आहेत. या सायबर दुत कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा घटना थांबवता येतील असा विश्वास नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

Nashik Cyber Police
Raids On Milk Dairies : चाळीसगावातील दूध डेअऱ्यांवर छापे; पथकाकडून १३०० लिटर दूध नष्ट

असा असेल प्लॅन 

नाशिक पोलीस या कार्यक्रमाच्या अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक कशा पद्धतीने टाळता येईल; याबाबत पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर हेच विद्यार्थी पुढे सायबर दूत म्हणून आपल्या विद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि इतर मित्र वर्गाला सायबर क्राईमचा धोक्यापासून कसे वाचता येईल यासंदर्भात जनजागृती करणार आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com