Ahmadpur Crime News : धक्कादायक! आणखीन एक निष्पाप बळी; अहमदपूरमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात

याप्रकरणी डॉ. किनगावकर यांच्या विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
Ahmedpur Crime News
Ahmedpur Crime NewsSaam Tv
Published On

दीपक क्षीरसागर

Ahmadpur Crime News : गर्भपातासाठी शसनामार्फत नियम व अटी दिलेल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भपात्याच्या घटना घडत आहेत. अहमदपूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत सदर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदपूरमधील किनगावकर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी डॉ. किनगावकर यांच्या विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तालुका समुचित प्राधिकाऱ्यांना ही बाब आढळून आल्याने त्यांनी दिलेल्या अहवालावरून व जिल्हा शल्यचिकित्सकांनी नियुक्त केलेल्या तपासणी पथकाच्या चौकशीवरून सदर घटनेचा खुलासा झाला. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि वैद्यकीय गर्भपात एमटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याचे यात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दत्तात्रय कालीदास बिराजदार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. डॉ दत्तात्रय कालीदास अहमदपूर (Ahmadpur) तालुका समुचित प्राधिकारी आहेत. १५ फेब्रुवारी रोजी त्यांनी डॉ. किनगावकर यांच्या हास्पीटल एमटीपी सेंटरला भेट दिली होती.

तेथे त्यांना अवैध गर्भपात (Abortion)केल्याच्या नोंदी आढळून आल्या. त्यांनी सिव्हील सर्जन लातूर यांना तसा अहवाल सादर केला. सिव्हील सर्जनने एक तपासणी पथक तयार करून पुन्हा किनगावकर हास्पीटलची तपासणी केली. सदर तपासणीअंती त्यांना तेथे २०१४ ते २०२२ च्या दरम्यान शासनाने घालून दिलेले नियमांचे वैद्यकीय गर्भपात एमटीपी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या गर्भपात केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. किनगावकर यांच्यावर अहमदपूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com