डिसले गुरुजी अखेर अमेरिकेला जाणार; राज्याचा शिक्षण विभाग मदत करणार

चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale विष्णूभूषण लिमये
Published On

सोलापूर: ग्लोबल टिचर डिसले गुरुजींनी सोलापूरसह भारताचा नाव जगाच्या पटलावर पोहचवलं. मात्र, जगाने दखल घेतलेल्या शिक्षकाला आपल्याच शिक्षण व्यवस्थेकडून त्रास झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं डिसले गुरुजींचा अमेरिकेला (USA) जाण्याचा मार्ग खडतर झाला होता, तो 'साम'च्या मोहिमेमूळ सुकूर झाला आहे. जगाने दखल घेतलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींना (Ranjitsinh Disale) पी एच डी साठी अमेरिकेला जायचे होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद सोलापूरकडे (Solapur) सहा महिन्यांची रजा मागितली मात्र, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ही राजा फेटाळण्यात आली. त्यामुळं डिसले गुरुजी उद्विग्न होऊन राजीनामा देण्याच्या मानसिकतेमध्ये गेले होते.

Ranjitsinh Disale
IPL 2022 Auction: स्टार खेळाडूंच्या बेस प्राईस ठरल्या; वाचा संपूर्ण यादी

डिसले गुरुजी हे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडीतील शाळेवर शिकवतात, दरम्यानच्या काळात त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आलेल्या डाएट कॉलेजवर शिकवण्यासाठी ते मागच्या तीन वर्षांपासून ते गेलेच नाहीत असं जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आल, त्यामुळं याची पडताळणी करण्यासाठी एक चौकशी समिती देखील शिक्षण विभागाकडून गठीत करण्यात आली. मात्र, जर मी कर्तव्यावर हजरच नव्हतो तर शिक्षण विभागाने वेळेवर पगार का दिला असा सवाल डिसले गुरुजींनी उपस्थित केला. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.

'साम'ने लावून धरलेल्या या बातमीची दखल अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे. डिसले गुरुजींना परदेशात जाण्यासाठी राज्याचे शिक्षण विभाग मदत करेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ही वर्षा गायकवाडांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच डिसले गुरुजी हे अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घेणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com