IPL 2022
IPL 2022Saam TV

IPL 2022 Auction: स्टार खेळाडूंच्या बेस प्राईस ठरल्या; वाचा संपूर्ण यादी

आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.

BCCI ने IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस गेल, मिचेल स्टार्क आणि सॅम करन यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात सहभागी होणार नाही. दरम्यान, T-20 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner), रविचंद्रन अश्विन, मिचेल मार्श, कागिसो रबाडा आणि इतर 45 खेळाडूंची IPL लिलावात 2 कोटी रुपयांची बेस किंमत आहे.

IPL 2022
Pune Corona Update: पुण्यातील जलतरण तलाव, उद्याने सुरु होणार!

या यादीत काही मोठी नावे देखील आहेत ज्यात 17 भारतीय आणि 32 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, स्टीव्हन स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 10 फ्रँचायझींनी 33 खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी आणि आपल्या गोटात सामिल करुन घेण्यासाठी सुमारे 338 कोटी रुपये आधीच खर्च केले आहेत.

BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 1,214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू) IPL 2022 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी साइन अप केले आहे. दोन दिवसीय मेगा लिलावात, 10 संघ जागतिक क्रिकेटमधील काही सर्वोत्तम खेळाडूंवर बोली लावणार आहेत. खेळाडूंच्या यादीत 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 सहयोगी खेळाडूंचा समावेश आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com