Maharashtra Local Body Elections: निवडणुका नेमक्या कधी होणार? महायुतीच्या नेत्याने थेट तारखाच सांगितल्या

Dilip Walse Patil Election Announcement Controversy: दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखा सांगितल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली असून, अधिकृत घोषणेपूर्वीच चर्चेला उधाण आलं आहे.
Maharashtra Politics Heats Up as Walse-Patil Reveals Possible Election Timeline
Maharashtra Politics Heats Up as Walse-Patil Reveals Possible Election TimelineSaam Tv
Published On
Summary

माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संभाव्य तारखा सांगितल्या.

५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान सर्व निवडणुका पूर्ण होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या घोषणेपूर्वी दिलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात मतचोरीविरोधातील एल्गार सभा मुंबईत पडत असतानाच माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना त्यांनी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे,” असं वळसे पाटलांनी सांगितलं. मात्र, आमच्याकडील माहितीनुसार ५ नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. तर १५ डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होईल.

Maharashtra Politics Heats Up as Walse-Patil Reveals Possible Election Timeline
पुण्यात गँगवॉर! आंदेकर टोळीतील समीर काळेच्या भावावर गोळीबार; गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानं हल्ला

जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊन १५ जानेवारीला मतदान पार पडेल, आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास वळसे पाटलांनी व्यक्त केला. त्यामुळे वळसे पाटलांनी जाहीर केलेल्या या संभाव्य वेळापत्रकामुळे राज्यातील राजकारण आणखी तापणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Maharashtra Politics Heats Up as Walse-Patil Reveals Possible Election Timeline
Mumbai Railway Block : एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी रेल्वेचा ७८ दिवसांचा ब्लॉक, दररोज चार तास लोकल बंद ठेवली जाणार

वळसे-पाटील यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाच्या औपचारिक घोषणेपूर्वी अशा प्रकारे संभाव्य वेळापत्रक सांगितल्याने विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.मागच्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने नगरपालिका, महापालिकावर प्रशासकीय राजवट सुरू आहे.

Maharashtra Politics Heats Up as Walse-Patil Reveals Possible Election Timeline
Police Bharti: पिंपरी चिंचवड शहर पोलिस भरती; ३२२ पदांसाठी होणार; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

सुप्रीम कोर्टाने देखील या निवडणुका 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे निवडणुक आयोगावर विरोधी पक्ष रोज नवनवीन गंभीर आरोप करत पुरावे सादर करत आहे. तर आज दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं वेळापत्रकच जाहीर केल्याने आता अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com