Maharashtra Politics: धुळ्यात राजकीय धुरळा; खान्देशात भाजप देणार काँग्रेसला मोठा धक्का

Dhule Politics: माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कुणाल पाटील यांनी जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतलीय.
Maharashtra Politics
Dhule Politicssaamtv
Published On

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कामाला लागलीय. खान्देशात आपली ताकद वाढवत आहे. धुळ्यात भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. याच दरम्यान कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतलीय. (Congress Former MLA Kunal Patil Likely Join Bjp)

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी कुणाल पाटील यांच्या सहकार कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेसचे नेते होते, ते काही काळ मंत्री होते.

Maharashtra Politics
Marathi Morcha : राज-उद्धव ठाकरे मराठीसाठी नाही, महापालिका निवडणुकांसाठी एकत्र; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकांआधी महायुतीच्या पक्षांमध्ये जोरात इनकमिंग सुरू आहे. भाजप खान्देशात आपली ताकद वाढवत आहे, त्यामुळे तेथील काँग्रेसच्या नेत्यांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु स्थानिक राजकीय वर्तुळात मात्र वेगळाच वाद सुरू झालाय. पाटील यांच्या प्रवेशाच्या केवळ चर्चा आहेत. तरी भाजपमधील भविष्यातल्या संभाव्य गटबाजीचीही चर्चाही त्यानिमित्ताने रंगू लागलीय.

कुणाल पाटील यांच्या प्रवेशाआधीच वाद सुरु झाला असून आमदार राम भदाणे व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झालेत. धुळे तालुक्यातील दोन्ही गटांचे कार्यकर्ते आधीच आक्रमकपणे सक्रिय झालेत. कुणाल पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाआधीच पुढे निर्माण होणाऱ्या गटातटाच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेलेय.

गेल्या दिवसांपासून मतदारसंघात कुणाल पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरूय. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे इतरही काही नेते व पदाधिकारी भाजपमध्ये जाणार असल्याचे बोललं जातंय. त्यातच कुणाल पाटील यांनी भाजपचे नेते प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने लवकरच पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरेल. चर्चा होत असतानाच धुळे तालुक्यात मात्र राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com