धुळ्यात पाणीप्रश्न पेटला; नगरसेविका स्वतःच चढल्‍या पाण्याच्या टाकीवर

धुळ्यात पाणीप्रश्न पेटला; नगरसेविका स्वतःच चढल्‍या पाण्याच्या टाकीवर
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv

धुळे : धुळे शहरात भर उन्‍हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत नागरीकांनी देखील आंदोलन केले. या प्रश्‍नावर लोकप्रतिनिधी संतप्त झाले असून पाण्यासंदर्भात (Dhule News) प्रशासन गंभीर नसल्याचे म्हणत नगरसेविकेने चक्‍क शोले स्टाईल आंदोलन केले. (dhule news Water problem in Dhule Corporator herself on the rising water tank)

Dhule Corporation
जंगल सफारीसाठी फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

धुळे (Dhule) शहरात पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. आठ– दहा दिवसानंतर नागरीकांना पाणी मिळत आहे. यामुळे नागरीकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. परंतु, अद्यापपर्यंत पाणी प्रश्‍न सुटलेला नाही. भर उन्‍हात शहरातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत. या विरोधात आज शहरातील देवपूर परिसरात असलेल्‍या नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून केले नगरसेविकेने शोले स्टाईल आंदोलन केले.

नगरसेविकेसोबत महिलाही टाकीवर

तापमानाचा पारा हा 41, 42 तर कधी 44 अंश पेक्षा देखील पुढे जात असल्यामुळे एकीकडे उन्हाच्या झळा सहन करत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे, पाण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे म्हणत एमआयएमच्या नगरसेविका नाजिया पठाण यांची प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नगरसेविकेने शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. नगरसेविकेसह परिसरातील महिलांनी देखील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com