जंगल सफारीसाठी फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

जंगल सफारीसाठी फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शहानुर पर्यटनस्थळी एका पर्यटकाचा मृत्यु झाला. रात्री झोपेचे औषध घेतल्याने या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शहानूर संकुल निवासस्थानी घडली. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (akola news Death of a tourist on akot jungle safari)

Akola News
शेताचा वाद; काकाकडून मारहाण, तरुणाचा मृत्‍यू

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या शहानूरमध्ये गेल्या महिन्यापासून अनेकदा अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन घडते. अकोट तालुक्यातील शहानूर, नरनाळा आणि बोरी हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतो. शहानुर येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक येत आहेत. यावेळी वाघ, बिबटसह अस्वल इतर वन्य प्राण्यांचे दर्शन होत आहे. यानंतर या भागात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

जेवणानंतर झोपले ते उठलेच नाही

दरम्यान विशाल देशपांडे (रा. अचलपुर, ता. अचलपुर, जि. अमरावती) हे गुरुवारी त्यांच्या मित्रांबरोबर शहानूर, नरनाळा आणि बोरी या जंगल सफारीसाठी आले. सायंकाळी जेवणाअगोदर त्यांनी झोपेचे औषध घेतले. बराच वेळ झाला त्यांच्यात हालचाल न जाणवल्याने त्यांच्या मित्रांनी अकोट वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे यांना माहिती दिली. वन कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांची मदतीने विशाल यांना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तरीही विशाल यांचा मृत्यु मागील नेमके कारण काय? हे अद्याप कळू शकले नाही. वैद्यकीय अहवालानंतर मृत्‍यूचे खरे कारण समोर येणार. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com