Dhule LCB Action : धुळ्यात उधळला नशेचा बाजार; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Dhule News : सुरत येथून धुळ्यामध्ये गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली
Dhule LCB Action
Dhule LCB ActionSaam tv
Published On

धुळे : धुळ्यात गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा वापर करून नशेचा बाजार केला जात आहे. हा बाजार धुळ्याच्या (Dhule) स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने उधळून लावलेलं असून नशेचा बाजार करणाऱ्या दोघा आरोपींच्या पथकाने गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

Dhule LCB Action
Abhijit Adsul : नवनीत राणांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट उशीर का करतेय?; अभिजित अडसूळ यांचा सवाल

सुरत (Surat) येथून धुळ्यामध्ये गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Dhule LCB) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये संबंधित इसम हा रिक्षातून या बाटल्यांचे बॉक्स उतरवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. (Police) पोलिसांनी तात्काळ संबंधित इसमास ताब्यात घेत या सर्व बॉक्सेसची तपासणी केली असता, त्यामध्ये गुंगीकारक औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांना आढळून आला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule LCB Action
Jalgaon Crime : एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या; साडेचार लाखांचे सोने लंपास

१ लाख १३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी या कारवाईदरम्यान सुरतहून आलेल्या इसमासह धुळ्यातील एका इसमास देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुंगीकारक औषधांच्या जवळपास ३५७ बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत जवळपास एक लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हस्तगत केला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com