Koli Samaj Rasta Roko : आदिवासी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोळी समाजाचे आंदोलन; आंदोलकांकडून रास्ता रोको

Dhule News ; सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थित मागील आठ दिवसांपासुन कोळी समाजासाठी उपोषण सुरू आहे.
Koli Samaj Rasta Roko
Koli Samaj Rasta RokoSaam tv
Published On

धुळे : आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या बांधवांना आदिवासी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी गेल्या (Dhule) आठ दिवसांपासून आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव हे उपोषण करीत आहेत. उपोषणाकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलकांनी आज (Rasta Roko) रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

Koli Samaj Rasta Roko
Bhusawal Accident : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; तीन जण जखमी

धुळे येथे सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थित मागील आठ दिवसांपासुन कोळी समाजासाठी उपोषण सुरू आहे. मात्र गेल्या आठ दिवसात प्रशासनाचा कोणीही अधिकारी फिराकला नसल्याचा आरोप यावेळी संबंधित उपोषणकर्त्यांनी लावला आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी म्हणूनच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला असल्याचे यावेळी आंदोलकांत तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Koli Samaj Rasta Roko
Hingoli News : एकाच ट्रकमध्ये ४२ जनावरांची कोंबून अवैध वाहतूक; हिंगोलीत पोलिसांनी कारवाई करत सुटका

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात 

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर या रास्ता रोकोत सहभागी झालेल्या आदिवासी टोकरे कोळी बांधवांना पोलिसांनी त्यांचे आंदोलन थांबवत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर आगामी काळात मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com