Bribe: डिमांडनोटसाठी मागितली लाच; वीज वितरण अभियंत्यांसह तंत्रज्ञाला अटक

डिमांडनोटसाठी मागितली लाच; वीज वितरण अभियंत्यांसह तंत्रज्ञाला अटक
Dhule News Bribe
Dhule News BribeSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : वाणिज्यिक प्रयोजनाच्या वीज पुरवठ्याची डिमांड नोट काढण्यासाठी दहा हजारांची (Bribe) लाच स्वीकारतांना (MSEDCL) वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule ACB) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (ता.3) वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर करण्यात आली. (Maharashtra News)

Dhule News Bribe
Ajit Pawar: प्रकल्प येणार असतील तर यादी दाखवा; अजित पवारांचे शिंदे सरकारला आव्‍हान

वीज कंपनीच्या सुळे (ता. शिरपूर) कक्षाचा कनिष्ठ अभियंता समाधान सुधाकर पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदाराचे खंबाळे (ता.शिरपूर) येथे बिअर आणि वाईन शॉप आहे. तेथे वाणिज्यिक वीज पुरवठा घ्यावयाचा असल्याने त्यांनी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज केला होता.

दहा हजार रुपयांची मागणी

२ नोव्हेंबरला सुळे येथील कक्षात जाऊन त्यांनी अभियंता समाधान पाटील याच्याकडे ऑनलाइन अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली. समाधान पाटील याने डिमांड नोट काढण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी याची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर निलेश माळी खंबाळे येथे जाऊन तक्रारदाराला दुकानावर जाऊन भेटला. डिमांड काढण्यासाठी समाधान पाटील यांच्या नावाने त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरुन तक्रार दिली. विभागाच्या अधिकार्‍यांनी शिरपूरला येऊन तक्रार नोंदवली.

दोघांविरोधात गुन्हा

तक्रारीची पडताळणी केल्यावर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना निलेश माळी याला मुद्देमालासह अटक करण्यात आली. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे येथील उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com