शिर्डी (अहमदनगर) : स्वतःचे अपयश झाकण्यासाठी शिंदे– फडणवीस सरकार भरती करणार असल्याची घोषणा करताहेत. मात्र लाखो तरूणांना (Shirdi) ज्या मोठमोठ्या प्रकल्पातून नोकरी मिळणार होती, ते प्रकल्प राज्याबाहेर गेले. आता म्हणताहेत आम्ही नविन प्रकल्प आणून भरती करणार आहोत. जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा असं आवाहन (Ajit Pawar) अजित पवारांनी शिंदे सरकारला केले आहे. (Breaking Marathi News)
आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीस (Maharashtra Government) सरकार करतेय. मात्र आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलेय की प्रकल्प कधी बाहेर गेले असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेले पत्रच दाखवले.
त्या दिवशी सरकार कोसळेल
जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे. तोवर हे सरकार चालेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल; त्या दिवशी हे सरकार कोसळेल असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही लाखो तरूणांना रोजगार देणार असं आता राज्य सरकार म्हणतंय मात्र मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले त्याचे अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टिका अजित पवारांनी केली..
पंचनाम्यांसाठी घेतले जाताय शेतकऱ्यांकडून पैसे
शेतकऱ्यांना मदत देणार अशा केवळ घोषणा केल्या जाता आहेत. ज्या शेतकऱ्याकडे आज दमडी नाही. त्यांच्याकडूनच पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले जाता आहेत. मग सरकार काय मजा बघतंय का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.