धुळे : साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्पाच्या उजवा वाढीव कालव्याचे गेल्या ३८ वर्षांपासून काम रखडले आहे. यामुळे परिसरातील जवळपास पाच गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याने अखेर जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीतर्फे सिंचन भवनवर संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढत कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. (dhule-news-panjhara-project-work-pending-Outraged-farmers-sit-outside-the-Irrigation-Building)
सदर रखडलेल्या कामाबाबत यापुर्वी देखील प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील प्रशासनातर्फे जवळपास 38 वर्षांपासून कुठल्याही प्रकारची हालचाल यासंदर्भात करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील जवळपास पाच गावांमधील शेतकरी त्यांच्या सिंचनाच्या हक्कापासून वंचित राहिले आहे. अखेर साक्री तालुक्यातील या शेतकऱ्यांनी सिंचन भवनाबाहेर ठिय्या देत जोपर्यंत यासंदर्भात प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या संतप्त शेतकऱ्यांनी घेतला आहे.
हवाय एक महिना
शेतकऱ्यांचा आक्रोश बघता संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात एक महिन्यात या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन संबंधित संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांना केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.