Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News : पांझरा नदी पात्रात पोषण आहाराची पाकीट; परिसरात उडाली खळबळ

Dhule news : प्रशासनातर्फे गर्भवती महिलांना पोषण आहार योजना राबविली जाते. ही योजना राबविण्यासाठी राज्य सरकारतर्फे मोठा निधी देखील खर्च केला जातो.
Published on

धुळे : शासनाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पोषण आहाराची पाकिटचा पुरवठा केला जात असतो. दरम्यान या पोषण आहाराची रिकामे पाकीट धुळे शहरातुन गेलेल्या पांझरा नदीच्या पात्रात आढळून आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाकीट कुठून आली असावीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Dhule News
Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात; देहू संस्थांकडून उभारण्यात आले नवे मंदिर

प्रशासनातर्फे गर्भवती महिलांना पोषण आहार (Poshan Aahar) योजना राबविली जाते. ही योजना राबविण्यासाठी राज्य सरकारतर्फे मोठा निधी देखील खर्च केला जातो. परंतु यात बऱ्याचदा घोटाळे किंवा निकृष्ट आहार पुरवठा असे प्रकार वारंवार समोर येत आले आहेत. दरम्यान गर्भवती महिलांसाठी पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहाराची पाकिटे अशाप्रकारे पांझरा नदीपात्रामध्ये (Panjhara River) एकत्रित एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकामी पाकीट आढळून आल्यामुळे ही पोषण आहाराची पाकीट प्रशासनाच्या कामचूकार कार्यप्रणालीचाच तर भाग नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Dhule News
Sambhajinagar Bribe Case : १ लाखाची लाच घेताना महावितरणचा अधिकारी जाळ्यात; कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेकेदाराकडून घेतली लाच

पाकीट आली कोठून याचा शोध 

पोषण आहारासाठी शासनातर्फे दिली जाणारी पोषण आहाराची रिकामी पाकीट (Dhule) धुळ्यातील पांझरा नदी पत्रात आढळून आली आहेत. पांझरा नदीपात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रिकामी पाकीट आली कुठून आणि ही पाकीट कोणी टाकली? हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित ही पोषण आहाराची रिकामी पाकीट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com