suicide case
suicide case

दीर– भावजायचे प्रेमसंबंध; विषप्राशन करून दोघांची आत्महत्या

भावजाय– दीराचे प्रेमसंबंध; विषप्राशन करून दोघांची आत्महत्या
Published on

सोनगीर (धुळे) : बोरीस (ता. धुळे) येथील युवक व युवतीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २१) उघडकीस आली. दोन्ही विवाहित असून दोघांत प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला असावा असा अंदाज आहे. गुरुवारपासून (ता. १६) ते पळून गेले होते. शुक्रवारी (ता. १७) हरवल्याची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दाखल होती. (dhule-news-love-affair-Both-committed-suicide-by-poisoning)

suicide case
गुड न्यूज.. अनुकंप पदभरतीचा पुन्‍हा जॅकपॉट!

बोरीस येथील प्रतिभा भगवान पवार (वय २४) व मुकेश दिलीप पवार (वय २६) यांच्यात प्रेमसंबंध होते. हे दोन्ही विवाहित होते व दोघांना प्रत्येकी दोन मुलेही आहेत. दोघे एकाच गल्लीत राहतात. तसेच ते एकाच समाजाचे असून त्यांच्यात चुलत दीर भावजयीचे नाते असल्याचे समजते.

दोघेही गेले होते पळून

पाच दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता ते पळून गेले. याबाबत प्रतिभाचे नातलग अरुण चव्हाण यांनी, तर मुकेशचे वडील दिलीप पवार यांनी हरवल्याची फिर्याद दिली होती. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एका शेतकऱ्याला (Farmer) प्रतिभाच्या शेतातच दोघांचे मृतदेह आढळून आले. पाच दिवसात मृतदेह कुजायला लागले होते. शवविच्छेदनानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल. ज्ञानेश्वर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस (Police) उपनिरीक्षक नामदेव सहारे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com