Dhule News: जैन समाजाचा मुक मोर्चा; जैन तीर्थक्षेत्रास पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्‍याचा निषेध

जैन समाजाचा मुक मोर्चा; जैन तीर्थक्षेत्रास पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्‍याचा निषेध
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचा केंद्र पर्यटन स्थळाचा यादीत समावेश झाला. या तीर्थस्थळाचे पवित्र राखण्यासाठी शिरपूरचा (Shirpur) सकल जैन समाज एकवटला असून याच्या निषेधार्थ जैन समाज संघटनेतर्फे व समाज बांधवांतर्फे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. (Tajya Batmya)

Dhule News
Nanded News: देव, देव्‍हारे जिल्हाधिकारींकडे करणार जमा; जात पडताळणी समितीच्‍या अजब निर्णयाने आदिवासी कोळी समाज संतप्‍त

झारखंडमधील जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थान (Dhule News) म्हणून ओळखले जाणारे श्री सम्मेद शिखरजी जैन तीर्थक्षेत्रास झारखंड (Jharkhand) सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला. या निर्णयाने शिरपूर येथील सकल जैन समाजाने जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील जैन समाजातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या आस्थापन बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. जैन व्यावसायिकांच्या या बंदला पाठिंबा म्हणून अन्य धर्मिय व्यवसायिक ही या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

निर्णय मागे घेण्याची मागणी

निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे. तहसील कार्यालयामार्फत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र शासनाने निर्णय मागे घ्यावा; अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com