Dhule Temperature : धुळ्यात पुन्हा उच्चाकी तापमान; सलग तिसऱ्या दिवशी तापमानामध्ये वाढ

Dhule news : तीन दिवसांपूर्वी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर काल ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ होत ४२.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
Dhule Temperature
Dhule TemperatureSaam tv
Published On

धुळे : धुळ्यात तापमानाचा पारा वाढतच आहे. सुरवातीपासून धुळ्यातील तापमान सर्वाधिक राहिले असून आज पुन्हा उच्चाकी तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी देखील वाढताना दिसून येत आहे. आज धुळ्यामध्ये ४२.५ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे उष्णतेची लाट पसरल्याचे अनुभव धुळेकरांना येत आहे. 

धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होत असून, गेल्या तीन दिवसांपूर्वी ४१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर काल ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली होती. तर आज सलग तिसऱ्या दिवशी तापमानात वाढ होत ४२.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुढील दिवसात आणखी तापमान वाढीची शक्यता वर्तविली जात आहे. 

Dhule Temperature
Tomato Price : २०० किलो टोमॅटोचा लाल चिखल; दर मिळत नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन

जळगावचा पाराही वाढला 

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती. यामुळे तापमान ३९ अंशापर्यंत खाली आले होते. यानंतर पुन्हा एकद तापमानात वाढ झाली असून पारा ४१ अंशापर्यंत वर गेला आहे. यामुळे सकाळी अकरा वाजेपासूनच उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. पुढील चार- पाच दिवस तापमान असेच राहणार अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Dhule Temperature
Railway : आता रेल्वेतही काढता येणार एटीएममधून रक्कम; रेल्वे प्रवासादरम्यान सुविधा

तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम 

तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून या वाढत्या तापमानाचा परिणाम शरीरावर देखील होताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना डिहायड्रेशन सारखा त्रास उद्भवू लागल्यामुळे नागरिक वाढता तापमानाचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करत आहे. तापमान वाढीच्या त्रासामुळे हैराण असलेले नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com