Satyajeet Tambe Girish Mahajan
Satyajeet Tambe Girish MahajanSaam tv

Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या भाजप पाठिंबाबाबत मंत्री गिरीश महाजनांनी केले स्‍पष्‍ट

सत्यजित तांबेंच्या भाजप पाठिंबाबाबत मंत्री गिरीश महाजनांनी केले स्‍पष्‍ट
Published on

धुळे : आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सत्यजित तांबे यांना कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हे त्यांच्यावरती असल्याचे स्पष्ट केले आहे. (Letest Marathi News)

Satyajeet Tambe Girish Mahajan
Jalna News: मुलींचे हाल! ना पिण्याचे पाणी ना वेळेवर जेवण, शासकीय वस्तीगृहातील मुलींचं तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन धुळ्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्‍यांनी पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांच्या भाजप पाठिंबा संदर्भात बोलताना भाजपची (BJP) भूमिका स्पष्ट केली आहे.

महाजनांची सावध भुमिका

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार सत्यजित तांबे हे कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याची उत्सुकता कायम आहे. सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आल्यानंतर याबाबत त्यांनी सावध भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असून हा संपूर्णपणे त्यांचा निर्णय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com