Jalna News: मुलींचे हाल! ना पिण्याचे पाणी ना वेळेवर जेवण, शासकीय वस्तीगृहातील मुलींचं तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

या संपूर्ण प्रकरणी आपली किफायत मांडताना मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
 Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

Jalna News: अंबड शहरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहात सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी करत मुलींनी आक्रमक भूमिका घेत थेट तहसील कार्यालय गाठले आणि ठिय्या आंदोलन केले. सदर घटना काल सायंकाळी चारच्या सुमारास घडलीय. संतप्त झालेल्या 50 ते 60 मुलींनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून वस्तीगृहात सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचल्याने एकच गोधळ उडाला. (Latest Jalna News)

त्यानंतर तहसीलदार यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर मुली वसतिगृहात परतल्या. मुलींनी नोंदवलेल्या तक्ररीनुसार, पोलिसांनी या साहित्याची तपासणी केली असता मुदत संपलेल्या बिस्किटाचे पाकीट वस्तीगृहात आढळून आल्याने एकच खबळ उडाली.

या संपूर्ण प्रकरणी आपली किफायत मांडताना मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. वार्डन कडून वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जाते. नियमानुसार मिळणारी अंडी,सलद, नाश्ता तर मिळतच नसल्याचं या मुलींनी सागितलं आहे. पिण्याच्या पाण्यासह आंघोळीला सुद्धा पाणी दिले जात नसल्याचा गंभीर आरोप या वेळी मुलींनी केल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 Jalna Crime News
विद्यार्थ्याकडूनही लाच; वस्तीगृहात प्रवेशासाठी मागितले पाच हजार

अंबड शहरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहात अनेक मुली शिक्षणासाठी राहतात. वेगवेगळ्या गावांतून आलेल्या या मुलींच्या आरोग्याची अशी हेळसांड होतं आहे. सतत अशा पद्धतीचा त्रास होत असल्याने मुलींना या वस्तीगृहात राहणे कठीण झाले आहे. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू देखील निट मिळत नाही आणि जेवणाचे देखील हाल असल्याचे मुलींनी केलेल्या तक्रारीवरून समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com