Dhule News: विद्युत पोलवरील चैनल, ट्रॅक्‍टर चोरी; तीन चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात

विद्युत पोलवरील चैनल, ट्रॅक्‍टर चोरी; तीन चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या (Dhule News) कारवाया केल्‍या. या कारवाईमध्‍ये तीन चोरट्यांना मुद्देमालासह ताब्‍यात घेतले आहे. (Tajya Batmya)

Dhule News
Jalna News: घाणेवाडी जलाशयात केवळ ११ टक्केच पाणीसाठा; जालन्यात उद्‌भवणार पाणीटंचाईच्या झळा

वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चैनल व एबी स्विच चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत. हे चोरटे रिक्षाच्या साहाय्याने चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी (Police) जवळपास ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघा चोरट्यांसह हस्तगत केला आहे.

Dhule News
Pune Crime: अवघ्या तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या

दुसरीकडे शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील चिमठाणा या ठिकाणाहून शेतकऱ्याची ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्र फिरवली असता ही चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याकडून त्याने चोरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com