Pune Crime: अवघ्या तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या

Pune IT Engineer Killed: अवघ्या तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv

पुणे : पुण्यातील वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी एका आयटी इंजिनियरची हत्या करण्यात (Pune) आली. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी ही हत्‍या झाल्‍याचे समोर आले आहे. मात्र हत्येच्‍या २४ तासात दोन आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Live Marathi News)

Pune Crime News
Amalner Accident News: यात्रेसाठी जाताना काळाचा घाला; बहिणीकडे आलेल्‍या तरूणीचा मृत्‍यू

पुणे येथे वास्‍तव्‍यास असलेला गौरव सुरेश उदाशी (वय ३५, शिवाजीनगर, अमरावती) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भगवान केंद्रे याच्याकडे चार चाकी आहे. ॲप आधारित टॅक्सी सर्विस तो पुरवतो. यातूनच भगवान आणि गौरव यांची ओळख झाली होती. गौरवने त्याच्या टॅक्सीतून यापूर्वी प्रवासही केला होता. त्याचीच ३ हजार रुपये गौरवकडे होते. हे पैसे परत न दिल्यानेच भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवचा (Crime News) खून केला

Pune Crime News
Jalna News: घाणेवाडी जलाशयात केवळ ११ टक्केच पाणीसाठा; जालन्यात उद्‌भवणार पाणीटंचाईच्या झळा

दोन जणांना अटक

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करत या प्रकरणी टॅक्सी चालक भगवान केंद्रे (उस्मानाबाद) व अमोल मानकर (वाशिम) यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com