Sakri Water Scarcity : उन्हाच्या झळा वाढताच विहिरींनी गाठला तळ; साक्री तालुक्यात भीषण पाणी टंचाई

Dhule News : गेल्यावर्षी साक्री तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तलाव, धरण कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत
Sakri Water Scarcity
Sakri Water ScarcitySakri Water Scarcity

धुळे : उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणी टंचाईची भिषणता देखील गडद होत चालली आहे. राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत असून (Dhule) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात देखील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, (Breaking Marathi News)

Sakri Water Scarcity
Nandurbar News : वातावरण बदलाचा फटका; कैरीची आवक कमी, आमचूर उत्पादनावर परिणाम

गेल्यावर्षी साक्री (Sakri) तालुक्यात समाधानकारक पाऊस (Rain) न झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तलाव, धरण कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. विहिरींनी देखील तळ गाठला असून साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत मालकीच्या विहिरी आहेत. मात्र त्या देखील पूर्णपणे कोरड्या पडलेल्या असल्याने मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत (Water scarcity) आहे. पुढील दोन महिन्यात पाणी टंचाईची ही भीषणता अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Sakri Water Scarcity
Manjra Dam : मांजरा धरणावरील पाणी पुरवठा योजनांकडे ४८ कोटी थकीत; पाणीपट्टी भरण्याबाबत बजावली नोटीस

बागायतीचे पीक अर्धवट सोडण्याची वेळ 

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी, डोमकणी, खुडाणे आदी गावांसह शेतकऱ्यांना शेतातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे स्रोत नसल्यामुळे बागायती शेती बंद करण्याची वेळ येऊन गेली असून अर्धवट पिके सोडावी लागण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com