Manjra Dam : मांजरा धरणावरील पाणी पुरवठा योजनांकडे ४८ कोटी थकीत; पाणीपट्टी भरण्याबाबत बजावली नोटीस

Beed News : बीडच्या मांजरा धरणाच्या पाण्यावर अनेक शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत आहे. त्याचबरोबर अनेक औद्योगिक वसाहतींना लागणारा पाणी पुरवठा अवलंबून आहे
Saam tv
Manjra DamManjra Dam

बीड : बीड जिल्ह्यातील प्रमुख एक असलेल्या मांजरा धरणावरील २२ पाणी पुरवठा योजनांकडे ४८ कोटींची पाणी पट्टी थकबाकी आहे. (Beed) थकबाकी असलेल्या संस्थांना नोटीस पाठवून थकबाकी भरण्यासंदर्भात सूचना केल्या असून पाणीपट्टी न भरल्यास पाणी बंद केले जाणार आहे. (Latest Marathi News)

Saam tv
Hingoli Loksabha : भाजपच्या ३ नेत्यांनी भरले अपक्ष उमेदवारी अर्ज, हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली

बीडच्या मांजरा धरणाच्या पाण्यावर अनेक शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत आहे. त्याचबरोबर अनेक औद्योगिक वसाहतींना लागणारा पाणी पुरवठा अवलंबून आहे. मांजर धरणात (Manjra dam) सध्या पुरेसा पाणी साठा आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी जाणवत नाही. मात्र पाणी योजनांची थकीत रक्कम वाढली असून हि रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा (Water Supply) कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saam tv
Nandurbar News : वातावरण बदलाचा फटका; कैरीची आवक कमी, आमचूर उत्पादनावर परिणाम

मांजरा धरणातून पाणी पुरवठा असणाऱ्या २२ पाणी पुरवठा योजनांकडे सुमारे ४७ कोटी ९२ लाख १८ हजार १६१ रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या सर्व पाणी पुरवठा योजनांना पाटबंधारे विभागाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच हि पाणी पट्टी लवकर न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com