दूध नाही तर विष पिताय! उकळताना दूध झालं अक्षरशः रबरासारखं

FDA Investigation Into Toxic Milk Video Viral: दूधातल्या भेसळीमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आलाय...मात्र दुधातील ही भेसळ नेमकी कशी समोर आली? दुधात रबरसारखा कोणता पदार्थ आढळला? या भेसळीमुळे अन्न आणि प्रशासन विभागाचा भोगळ कारभार कसा समोर आलाय?
Adulterated milk turns rubber-like when heated — shocking visuals from Dhule spark FDA probe
Adulterated milk turns rubber-like when heated — shocking visuals from Dhule spark FDA probeSaam Tv
Published On

तुम्ही दूध नाही.. तर विष पिताय... होय.. विष.. आणि याचं दूधातल्या विषामुळे तुम्हाला कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात...आम्ही असं का म्हणतोय.. तर आता हा व्हिडिओ नीट पाहा....

गॅसवर ठेवलेलं दूध उकळायला लागलं आणि काही क्षणातच त्याचा अक्षरश: रबरासारखा गोळा झालाय... होय रबर.. आता हाच रबर जर तुमच्या पोटात गेला तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा... ऐन दिवाळीत दुधातली ही भेसळ समोर आल्यानं नागरिकांना चांगलाच धक्का बसलाय..

दुसरीकडे दूधातली ही भेसळ समोर आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभाग खाडकन् जागा झालं आणि त्यांनी तपासणीसाठी दुधाचे नमुने घेतले...दरम्यान शिरपूरमधील या घटनेत विक्रेत्यानं दूधात नेमकं कशाची भेसळ केली असावी.. दूध रबरासारखं होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत.. हे साम टिव्हीनं तज्ज्ञाकडून जाणून घेतलं.

मुळात दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध, मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते... त्याचवेळी भेसळयुक्त दूधाचा साठा बाजारात सर्रास पाहायला मिळतोय.. अशात दूधातली ही भेसळ नेमकी कशी ओळखायची

कशी ओळखाल दूध भेसळ?

भेसळयुक्त दुधात लिटमस पेपरचा रंग निळा किंवा लाल होता

भेसळयुक्त दुधाची चव कडवट असते

भेसळयुक्त दुधाचा खवा कडक होतो

भेसळयुक्त दुधाला साबणासारखा वास येतो

भेसळयुक्त दूधाचा हा प्रकार जरी धुळ्यात घडला असला तरी राज्यात सर्रासपणे भेसळयुक्त दूधाची विक्री सुरू असते.. विक्रेते दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी असेच खेळत असतात...तरीही ही दूध भेसळ रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन विभाग पूर्ण अपयशी ठरलंय. धडधडीतपणे विक्री होणाऱ्या या भेसळयुक्त दुधाला आळा कसा घातला जाणार? नागरिकांच्या जीवांची हेळसाड करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com