Dhule : शेजाऱ्याशी भांडणाचा वाद विकोपाला; वाहनांच्या काचा फोडून माजवली दहशत

Dhule News : परिवारांमध्ये वाद उद्भवला होता. रात्री झालेला वाद परिसरातील नागरिकांनी मिटविला. मात्र मागील भांडणाची कुरापत काढत शेजारच्याने या परिवारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : शेजारी राहणाऱ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणावरून वाद होत असतात. अशाच प्रकारे शुल्लक कारणावरून झालेल्या वादाची कुरापत काढत शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झाले. मात्र या झालेल्या भांडणानंतर विकोपाला गेलेलय वादातून पहाटे चार वाजेच्या सुमरास वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना धुळे शहरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. 

धुळे शहरातील देवपूर परिसरातील विटाभट्टी परिसरात सदरची घटना घडली आहे. वीटभट्टी परिसरात सादिक मुश्ताक खाटीक व आवेश पठाण हे शेजारी शेजारी राहतात. या दोन्ही परिवारांमध्ये कोणत्या कोणत्या कारणावरून नेहमी वाद होत असतात. अशाच प्रकारे दोन्ही परिवारांमध्ये वाद उद्भवला होता. रात्री झालेला वाद परिसरातील नागरिकांनी मिटविला. मात्र मागील भांडणाची कुरापत काढत शेजारच्याने या परिवारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

Dhule News
Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले; शेकडो पर्यटकांनी केले काश्मीरचे बुकिंग रद्द

दहशत माजविण्याचा प्रयत्न 

दरम्यान भांडणाची कुरापत काढत रात्री चार वाजेच्या सुमारास पठाण यांनी घरात घुसून तलवारीचा धाक दाखवून नागरिकांना दहशतीखाली घेतले. तसेच त्यांच्याकडनं सोन्या-चांदीचे दागिने लुटले असल्याचा आरोप खाटीक यांनी लावला आहे. त्याचबरोबर परिसरात उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांच्या काचा देखील फोडून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी लावला आहे. 

Dhule News
Ekburji Dam : एकबुर्जी धरणात केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक; वाशिम शहरावर पाणी टंचाईचे सावट

कारवाईची मागणी 
दरम्यान या प्रकरणामध्ये ज्या वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. त्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात देवपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणात हस्तक्षेप करून या दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करावी; अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com