मनोज जयस्वाल
वाशीम : राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे संकट आता वाशीम शहरावर देखील घोंगावत आहे. कारण वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ सद्यस्थितीला ११.८६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, हा जलसाठा दीड ते दोन महिनेच पुरेल असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने वाशिम शहराला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. काही भागात पाणी टंचाईच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळत असून पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करत पाणी आणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे. हीच परिस्थिती आता वाशीम जिल्ह्यात निर्माण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असून पुढील काही दिवसात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धरणातून सिंचनासाठी पाणी उपसा सुरूच
वाशिम शहराला सहा ते आठ दिवसाआड तर काही भागात दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ४० दिवसांपूर्वी याच धरणात ३०.०८ टक्के जलसाठा शिल्लक होता. मागील ४० दिवसात जवळपास २० टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यात झपाट्याने घट झाली. तर सिंचनासाठी पाणी घेण्यास बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने धरणात सध्या ११.८६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
पाणीटंचाईचा फुलावर आलेल्या मुगाच्या पिकाला फटका
वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाच्या पेरणीला चांगला प्रतिसाद मिळालेला असताना अचानक उभी राहिलेली पाणी टंचाई शेतकऱ्यांसाठी मोठं संकट बनली आहे. मुगाच पिकं फुलांवर असतानाच पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुगात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्या आहेत. ढिल्ली येथे बॅरेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी पेरणी झाली होती. यंदाही सुमारे २०० ते ३०० एकरवर पेरणी झाली. मात्र बॅरेज कोरडे पडल्यामुळे व विहिरी, कूपनलिकांमध्येही पाणी नसल्याने १०० एकरवरील पिके सुकली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.