Dhule News: अल्पवयीन मुलीचा घरी नेत नर्सने केला गर्भपात; एकाला अटक, नर्स मात्र फरार

अल्पवयीन मुलीचा घरी नेत नर्सने केला गर्भपात; एकाला अटक, नर्स मात्र फरार
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

पिंपळनेर (धुळे) : वडारवाडीमधील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकऱणी एकाला अटक करण्यात आली असून, या मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप असलेली (Dhule News) धुळे येथील खासगी रुग्णालयातील परिचारिका प्रमिला पवार मात्र फरारी आहे. पिंपळनेर पोलिस तिचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) वडारवाडीतील संशयित राज सिकलकर याला अटक केली. (Breaking Marathi News)

Dhule News
Jalgaon News: लग्‍न लागण्यापुर्वी घडले अघटीत; देवदर्शनासाठी जाताना वऱ्हाडातील तिघांचा मृत्यू

मुलीच्या आईची तक्रार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडारवाडीमधील राजश्री या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला होता. त्यात ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. राजश्रीचे पोट दुखू लागल्याने आई रेणुकाबाईने तपासणीसाठी धुळ्याच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील परिचारिका प्रमिला पवारने आईला मुलीचे लग्न झालेले आहे का? असे विचारले असता आईने नाही असे सांगितले.

परिचारीकेने संधी साधत घरी केला गर्भपात

मुलगी गर्भवती असून, तिच्याशी अशा स्थितीत कोण लग्न (Marriage) करेल, त्यापेक्षा दहा हजार रुपये घेत आपल्या घरी गर्भपात (Abortion) करून देते; असे सांगितल्यावरून आईने मुलीचा गर्भपात करायचा की नाही याबाबत सांगते, असे सांगितले. परंतु परिचारिका प्रमिला पवारने आई व मुलीस बाफना हॉस्पिटलमधून (Hospital) तिच्या राहत्या घरी नेले. तेथे आईला हॉलमध्ये बसवून मुलीस दुसऱ्या एका खोलीत नेले. एक ते दीड तासाने मुलीस परत आणले व आता तुम्हाला काळजीचे कारण नाही, गर्भपात झाला आहे, असे सांगितले. मात्र घरी आणल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

शवविच्‍छेदनातून प्रकरणाला वाचा

शवविच्‍छेदनात ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. राजश्रीच्या मृत्यूस गर्भपात कारणीभूत असल्याचा आरोप करीत आईच्या माहितीवरून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या राज शिकलकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी परिचारिका प्रमिला पवार हिचा शोध घेतला जात आहे. उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com