महामार्गाच्या कामावरून तुळजापुरात राडा
कोयत्याने हल्ला आणि हवेत गोळीबार झाल्याची घटना
आचारसंहिता असतानाही शस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप
पोलिसांकडून गुन्हा दाखल, संशयित ताब्यात
तुळजापुरात नळदुर्गला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या कामावरून कर्मचाऱ्याला सुनावल्याच्या कारणावरून मंगळवारी नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार विनोद गंगणे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्या गटात कोयदा, दगड, विटा, काठ्यांनी तुफान हाणामारी झाली.त्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएच नाव जोडलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. जाणीवपूर्वक आम्हाला छेडण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असल्याचं काँग्रेसचे अमर कदम यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरात नळदुर्गला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे (काँग्रेस) नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचे नातेवाईक कंत्राटदार आहेत. यादरम्यान काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कारण सांगत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमदेवार विनोद उर्फ पिटू गंगणे कामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी तेथे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला खडेबोल सुनावले.
तसेच त्याच्याशी वादही घातला. हा प्रकार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांना समजला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे गंगणे यांना त्यांनी विरोध केला. तेव्हा दोघांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात समर्थक जमा झाले होते. धाराशिव जनता बँकेच्या शाखेच्या कार्यालयासमोर एकमेकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र वाद थांबलेला असतानाही गंगणे आणि त्यांचे सहकारी मगर यांच्या घराजवळ आले. तेथे मात्र, कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. त्यानंतर हवेत गोळीबार देखील करण्यात आला.
या घटनेनंतर आता गोळीबार प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएच नाव जोडलं जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक जयश कदम यांनी तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू गंगणेला सोबत घेऊन आमचे नातेवाईक करत आलेल्या तुळजापूर नळदुर्ग रस्ते कामावर शिवीगाळ केली. जाणीवपूर्वक आम्हाला छेडण्यासाठी ही शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अमर कदम यांनी केला. या आरोपामुळे राडा प्रकरणात आमदारांचे स्वीय सहाय्यक यांचं नाव जोडलं जात आहे.
राज्यात आचारसंहिता असताना परवाना धारक शस्त्र जमा केले जातात. मात्र हातात कोयते आणि गावठी कट्टे घेऊन दहशत माजवण्यात आली. त्यातून कोयत्याने हल्ला आणि गोळीबार करण्यात आला असल्याचा आरोप अमर कदम यांनी केला. तुळजापूर येथील राड्यात अमर कदम यांचे भाऊ कुलदीप कदम यांच्या मानेवर कोयत्याने वार झाले आहेत. त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत.गोळीबार प्रकरणामुळे तुळजापुरातील ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल असून कुलदीप मगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.