Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv

Dharashiv News : दोन दिवसाच्या पावसामुळे तळघरात पाणी; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधांचा साठा भिजला

Dharashiv News : धारशिवमध्ये गेली दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे औषधे ठेवलेल्या तळघरात पाणी साचल्याने औषधे भिजली आहेत.
Published on

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरात पाणी शिरले आहे. परिणामी येथे ठेवण्यात आलेल्या लाखो रुपये किंमतीचा औषधांचा साठा पावसाच्या पाण्याने भिजून नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dharashiv News
Amravati News : दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार

धारशिवमध्ये (Dharashiv) गेली दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे औषधे ठेवलेल्या तळघरात पाणी साचल्याने औषधे भिजली आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (Medical Collage) गलथान कारभार समोर आला आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पध्दतीने उभारलेल्या या इमारतीचे पितळ उघडे पडले आहे. 

Dharashiv News
Sambhajinagar News : लग्नाला दीड महिना झाला असतानाच काळाची झडप; शेती मशागत करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

बांधकाम करताना इमारतीचे व परीसरातील पाण्याचे आऊटलेट काढले नसल्याने दोन दिवस झालेल्या पावसात (Rain) तळघरात पाणी साठुन राहिले. त्यामुळे लाखो रुपयांचे किंमतीच्या औषधांचे नुकसान झाल्याचा आरोप करत या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र औषधांचा नुकसान झाले नसल्याचा दावा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. सिक्युरिटी गार्डच्या साह्याने तळघरातील २ कोटी रुपयांचा औषध साठा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com