Omprakash Rajenimbalkar News: शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच काम केंद्र सरकार करतय; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Dharashiv News शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच काम केंद्र सरकार करतय; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
Omprakash Rajenimbalkar
Omprakash RajenimbalkarSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करत आहे. केंद्र सरकार हे (Farmer) शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे व कुटुंब उद्ध्वस्त करण्याच काम करत (Dharashiv) असल्याचा आरोप धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Omprakash Rajenimbalkar
Anil Bonde Statement: कांद्याबाबत आंदोलन करून गळे काढण्याचं काम; खासदार अनिल बोंडेचा शरद पवारांवर निशाणा

केंद्र सरकारने जर कांदा निर्यात शुल्क दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास व शेतकऱ्यांना अशा प्रकारे निर्णय घेवुन देशोधडीला लावण्याच काम केले, तर शेतकरी हा मतपेटीच्या माध्यमातून चोख उत्तर देईल. जगातील कितीही लोकप्रिय नेता असला तरी आमच्या शेतकऱ्यांनी एकदा जर हातात रुमन उपसल तर रुमण्याचे घाव त्याच्यावर लावल्याशिवाय राहणार नाही; असा थेट इशारा नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी साधला आहे.  

Omprakash Rajenimbalkar
Kalyan News : पोलिसांविरोधात भाषण देणे पडले महागात; ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाविरोधात गुन्हा

दरवाढ निर्णयाची होळी 

दरम्यान केंद्र सरकारच्या कांदा दरवाढ निर्णयाची ठाकरे गटाच्या वतीने तुळजापूर येथे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कांद्याच्या माळा गळ्यात घालुन शिवसैनिक आंदोलन सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com