Tuljapur Vidhan Sabha : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजपच्या उमेदवाराविरोधात भाजप नेत्यानेच थोपटले दंड

Dharashiv News : विधानसभा निरवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडखोरी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
Tuljapur Vidhan Sabha
Tuljapur Vidhan SabhaSaam tv
Published On

बालाजी सुरवसे
धाराशिव
: तुळजापुर विधानसभा मतदारसंघात भाजपच्याच पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड यांनी दंड थोपटले आहेत. यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशी लढाई पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निरवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडखोरी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. (BJP) अर्थात नाराजीनाट्यातून हि बंडखोरी केली जात आहे. प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मित्र पक्षाकडून बंडखोरी केली जात आहे. मात्र (Tuljapur) तुळजापूरमध्ये भाजपने उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी भाजपच्याच पदाधिकाऱ्याने बंडखोरी करत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Tuljapur Vidhan Sabha
Nanded Lok Sabha : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपचा जनसंघापासुनचा एकनिष्ठ कार्यकर्ता असतानाही पक्षाने २०१९ मध्ये व आता २०२४ मध्ये देखील संधी दिली नाही. त्यामुळे मी राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांना पक्षांतर्गत सुरू असलेली बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com