Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी
Dharashiv NewsSaam Tv

Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी

Dharashiv News : तुळजापूरातील ड्रग्ज प्रकरण आणि अवैध धंद्यांचा पर्दाफाश केल्यामुळे ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना पोलिस निरीक्षकांकडून थेट अटकेची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
Published on
Summary
  • तुळजापूर पोलिस निरीक्षकांकडून पत्रकार सुनील ढेपे यांना थेट अटकेची धमकी.

  • ड्रग्ज प्रकरणे व अवैध धंदे उघड करणाऱ्या वृत्तमालिकेमुळे राग निर्माण झाल्याचा आरोप.

  • पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल; कठोर कारवाईची मागणी.

  • पत्रकार संघटनांचा इशारा – लोकशाही आणि पत्रकारिता स्वातंत्र्यावर हल्ला सहन केला जाणार नाही.

तुळजापूर परिसरात वाढत असलेल्या ड्रग्ज प्रकरणे आणि विविध अवैध धंद्यांवर निर्भीडपणे प्रकाश टाकणे हे ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना महागात पडले आहे. एका गुन्ह्याच्या चौकशीसंदर्भातील नोटीसवरून तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी त्यांना थेट अटकेची धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुनील ढेपे यांनी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १८९/२०२५ मध्ये साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी २० ऑगस्ट रोजी संपादक सुनील ढेपे यांना अधिकृत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, सध्या ते नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत तसेच सदर प्रकरणाविषयी त्यांना कोणतीही माहिती नसल्याने आपण हजर राहू शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना कळविले होते. परंतु या उत्तराने समाधान न झाल्याने आज सकाळी १०:३५ वाजता निरीक्षक मांजरे यांनी ढेपे यांना थेट व्हॉट्सॲप कॉल करून “तुळजापूरला येऊन जबाब द्यावा लागेल, नाहीतर उद्या पुण्यात पोलीस पाठवून तुला अटक करू,” अशी उघड धमकी दिली.

Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी
Tuljapur News: तुळजापुरात भाजप अन् जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमनेसामने| Video Viral

दरम्यान, या धमकीमागे थेट पत्रकारितेतील बातम्यांचा राग असल्याचा आरोप संपादक सुनील ढेपे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांत ‘धाराशिव लाइव्ह’ने तुळजापूर परिसरातील ड्रग्ज विक्री, गांजा व्यवहार, तसेच विविध अवैध धंद्यांच्या वाढत्या जाळ्यावर सलग वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या वृत्तांमध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवरच प्रशासनातील काही घटक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच जुन्या गुन्ह्यातील नोटीस, साक्षीदार म्हणून जबाब आणि अटकेची धमकी हा सगळा प्रकार रचला गेला असल्याची चर्चा सुरू आहे.

Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी
Tuljapur Tragedy: "माझ्यावर प्रेम कर नाहीतर...", छेडछाडीला कंटाळून पोलिसाच्या मुलीनं गळफास घेतला

सुनील ढेपे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकावणे हे केवळ सत्तेचा दुरुपयोग नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. लोकहितासाठी बातम्या मांडणाऱ्या पत्रकारांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला जात असून, हे लोकशाहीच्या तत्त्वांवरच घाला घालणारे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस निरीक्षक मांजरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी
Tuljapur: जेवला अन् झोपला, रात्रभर वेदनेनं विव्हळत; एकुलत्या एक मुलाचा झोपेतच हार्ट ॲटॅकनं मृत्यू

या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक पत्रकार संघटनांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यापुढे पत्रकारांवर दबाव टाकण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tuljapur News : तुळजापूरातील ड्रग्ज जाळे उघड करणाऱ्या पत्रकारला पोलीस निरीक्षकाची अटकेची धमकी
Tuljapur: तुळजापूर ड्रग्ज रॅकेट, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत कनेक्शन, 13 पुजाऱ्यांचा सहभाग

एकूणच तुळजापूरमधील ड्रग्ज जाळे आणि अवैध धंदे उघड करणाऱ्या बातम्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पत्रकारांवर थेट अटकेची धमकी दिली जाणे हा गंभीर प्रकार असून, यामुळे पत्रकारिता स्वातंत्र्य, पोलीस प्रशासनाची निष्पक्षता आणि लोकशाहीतील मूलभूत मूल्ये या तिन्हींच्या आघाडीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com