
धाराशिव सुकटा गावात पवनचक्कीच्या ठिकाणी तिघांना मारहाण.
फोटो काढल्याच्या कारणावरून मारहाण झाली.
बजरंग गोयकर यांची प्रकृती गंभीर; बार्शी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
पोलिसांनी पंचनामा केला; गुन्हा अद्याप नोंदलेला नाही.
धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पवनचक्कीच्या ठिकाणचे फोटो का काढला, या कारणावरून तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. अक्षरश: काळंनिळं होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. सध्या तिघांचीही प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा संपूर्ण प्रकार धाराशिवच्या भूम तालुक्यातील सुकटा येथे घडली आहे. पवनचक्कीशी संबंधित गुंडगिरी समोर आली आहे. काही जण पवनचक्की परिसरात गेले होते. त्याठिकाणी तिघांनी पवनचक्कीच्या ठिकाणचा फोटो काढला. फोटो काढत असताना आरोपींनी पाहिलं.
काही जण घटनास्थळी पोहोचले. गुंडांनी तिघांना बेदम मारहाण केली. बजरंग गोयकर,स्वप्निल गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ अशी मारहाण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मारहाण झालेल्या तिघांपैकी बजरंग गोयकर यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर बार्शीला जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या घटनेमुळे धाराशिवची गुंडगिरी समोर आली आहे.
धुळ्यात भीषण अपघात
धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला ट्रॅक्टरने अचानक हुलकावणी दिल्याने ट्रकचा ताबा सुटला आणि तो पुलावर आदळला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.