Shiv Sena : शिंदेंसेनेच्या नगराध्यक्षाने डॉक्टरला बेदम चोपले; 'या' एका कारणामुळे राडा, व्हिडिओ व्हायरल?

Shinde Sena Leader Video : धाराशिवच्या परंड्यात शिंदेसेनेच्या नगराध्यक्षावर डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीवरून झालेल्या वादानंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
Crime:
CrimeSaam tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Shinde Sena municipal chief assault case : धाराशिवच्या परंडा शहरात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षाने एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित डॉक्टर आनंद गोरख मोरे यांच्या तक्रारीनंतर परंडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मात्र, नगराध्यक्षाने डॉक्टरवर हात उचलण्यामागे जे कारण समोर आले आहे, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हॉस्पिटल शेजारी संरक्षण भिंत बांधण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचा आरोप पीडित डॉक्टर आनंद गोरख मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी डॉक्टर मोरे यांच्या तक्रारीवरून नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्यासह पाच जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Crime:
Ladki Bahin Yojana : लाडकीच्या कामाची बातमी! ₹3000 खात्यात जमा झाले नसतील तर…

धाराशिवच्या परंडा येथे नगराध्यक्षांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. फक्त किरकोळ कारणावरून झालेल्या वादात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर आनंद गोरख मोरे यांनी केला. मोरे यांच्या तक्रारीवरून जाकीर सौदागर सह पाच जनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या हॉस्पिटलला संरक्षण भिंत बांधायला काही लोकांनी विरोध केला. मात्र रुग्णांच्या सुरक्षेसाठी आपण संरक्षण भिंत बांधल्यानेच ही मारहाण झाल्याचा आरोप मोरे यांनी केला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डॉ . मोरे यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष असलेल्या जाकीर सौदागर यांचे थेट गुन्ह्यामध्ये नाव आल्याने चर्चेला उधाण आलय. पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार, याकडे परांड्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Crime:
Today Horoscope : 'या' राशींवर धनाचा वर्षाव होणार, तर कोणाला नशिबाची मिळणार साथ? पाहा आज तुमच्या भाग्यात काय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com