Dharashiv: खेळत असतानाच पाण्याच्या हौदात पडला, अडीच वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; गावात शोककळा

2.5-Year-Old Boy Drowns in Water Tank: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे एक अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
Dharashiv
DharashivSaam
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घराजवळ खेळत असताना जनावरांसाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात तो अचानक पडला. लहान बहिणीने आरडाओरड केल्याने घरच्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत त्याला हौदातून बाहेर काढले. तसेच रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली. समर्थ चव्हाण असे या बालकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वीच तो मामाच्या गावाहून परतला होता. चिमुकला घराजवळ खेळत होता. खेळता खेळता तो अचानक जनावरांसाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडला.

Dharashiv
Shocking: मध्यरात्री आईच्या बेडवर परपुरूष, मुलाची सटकली; आईच्या प्रियकराला लाकडी दांडक्यानं संपवलं

यादरम्यान, आपला भाऊ हौदात पडला असल्याचं त्याच्या बहिणीला दिसलं. तिने तातडीने आरडाओरड करत घरच्यांनी बोलावून घेतलं. घरच्यांनी त्याला लगेच हौदातून बाहेर काढलं आणि तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी आरोप केला की, वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते, तर समर्थचा जीव वाचू शकला असता. डॉक्टरांनी मृत्यू घोषित करताच घरात हंबरडा फूटला.

Dharashiv
NSC Scheme: वर्षाला ६० हजार गुंतवा, मॅच्युरिटीनंतर ४६.६७ लाख तुमचेच; सरकारची भन्नाट योजना एकदा पाहाच

आपल्या लेकराला वाचवण्यासाठी समर्थची आई धावत तुळजाभवानी देवीच्या मंदिराकडे गेली. सुमारे एक किलोमीटर अंतर धावत जात तीने देवीच्या महाद्वारावर दंडवत घातला. आईचा आक्रोश पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले. मात्र, लेकराचा दुद्रेवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com