Dasara Melava: तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी...; शायरीतून धनंजय मुंडे यांचा विरोधकांना टोला

Dhanjay Munde : भगवागड येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात बोलतांना धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय.
Dussehra Melava:  तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी...; शायरीतून धनंजय मुंडे यांचा विरोधकांना टोला
Dhanjay MundeTV9
Published On

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज दसऱ्यानिमित्त राज्यभरात होणाऱ्या चार दसरा मेळाव्यांना चांगलेच महत्त्व आलंय. या दसरा मेळाव्यातून एका प्रकारे प्रचाराचे रणशिंगच फुंकले जाणार असतांनाच धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाचा पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला हजेरी लावत मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला मारला.

शायरी करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना टोला मारला. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. 'तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे', असं धनंजय मुंडे यांनी विरोधकांना टोला लगावला.

दरम्यान राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर धंनजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ देत ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान आता आगामी विधानसभेला शरद पवारांनी धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी दंड थोपटले असून एक खास रणनीती आखत आहेत. शरद पवार एका नवा दमाच्या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.

परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे यांच्याविरोधात कोणाला उतरवायचे याची चाचपणी शरद पवार करताहेत. येथे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एन.के. देशमुख यांची छाप होती. त्यांचे पुतणे अभिजीत देशमुख हे राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Dussehra Melava:  तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी...; शायरीतून धनंजय मुंडे यांचा विरोधकांना टोला
Beed Dasara Melava : मनोज जरांगे की पंकजा मुंडे, कुणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी? VIDEO आला समोर

तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मुंडे यांच्यातील वाद कोणापासून लपले नाहीयेत. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी देखील औबीसी आणि मराठा, असा वाद मराठवाड्यात दिसून आला होता. मनोज जरांगे यांचा एम फॅक्टरमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. दरम्यान जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे तसेच सरसकट आरक्षण द्यावेत.

तसेच सगे सोयरे याचा उल्लेखही देण्यात आलेल्या आरक्षण जीआरमध्ये करावा, अशी जरांगे करत आहेत. त्यावर ते आक्रमक झाले असून, भाजप आणि महायुती सरकारविरोधात त्यांनी रणशिंग फुंकलंय. जरांगे यांनी आज दसऱ्याचा मुर्हूत साधत मेळावा घेतला. त्यात त्यांनी ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जातींवर ओबीसी नेत्यांवर शरसंधान साधलं.

काय म्हणाले धनंजय मुंडे

सर्व जाती धर्मातील लोकं या मेळाव्याचे निमित्ताने येथे आलेत. भगवानगडाच्या भूमिपूजनाला 1960 ला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. बाबाच्या मनात प्रश्न आला तेव्हा यशवंतराव म्हणाले की तुमच्या नावात भगवान आहे तर गडाला नावं ते द्या. 12वर्षांच्या या तपानंतर मी या ठिकाणी आलोय. पवित्र दसरा मिळव्याची एक आगळीवेगळी परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे. भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा हा भगवान बाबांच्या हाताने सोने देऊन व्हायचा. हीच परंपरा आपले दैवत गोपीनाथमुंडे यांनी चालवली. माझी बहीण पंकजा ही परंपरा चालवते, मोठा भाऊ म्हणून मला अभिमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com