Dhanjay Munde: दुरावा झाला दूर! अडचणीत सापडलेल्या पंकजाताईच्या मदतीला धावले धनुभाऊ

Dhanjay Munde: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केलीय.
dhanjaya munde
dhanjaya munde saam Tv
Published On

Dhanjay munde News:

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केलीय. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या इतर कारखान्यांना सरकारकडून मदत मिळत आहे. परंतु माझ्या कारखान्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली. आर्थिक सापडलेल्या बहिणीच्या मदतीला धनूभाऊ मदतीसाठी धावले आहेत.

कृषीमंत्री असलेले पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी वैर विसरत बहीण पंकजा मुंडे यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकमेंकांचे राजकीय प्रतिस्पर्धेक आहेत. या दोघांचे राजकीय वैर सर्व राज्याला माहिती आहे. दरम्यान सध्या अजित पवार गटात असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सत्तेत असून त्यांच्याकडे कृषी मंत्रालय आहे.

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दमदार नेते आहेत. तर पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षातील नेत्या आहेत. २०१४ मध्ये पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचा परळीमधून पराभव केला होता तर २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला. हे राजकीय वैर विसरुन धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंना मदतीस धावले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याले स्पष्ट झाले. या कारवाईत कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आपण आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावात आहोत. दररोज बँकांना भेट देत असल्याचं पंकजा मुंडेंनी एका कार्यक्रमात सांगितलं.

यासर्व प्रकरणानंतर निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. पंकजा मुंडे यांच्याशी कारखान्याबाबत चर्चा करून शक्य तेवढी मदत करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दुरावलेले बहीण-भाऊ एकत्र आल्याची चर्चा परत एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.

dhanjaya munde
Vaidyanath Sugar Factory: 'पंकजा मुंडेंनी योग्य भूमिका घ्यावी'; कारखान्यावरील कारवाईनंतर देशमुखांचा सल्ला की ऑफर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com