Dhananjay Munde : "टायगर अभि जिंदा है"..."टायगर इज बॅक"; मुंडेंच्या स्वागतासाठी परळी सज्ज

परळीत धनंजय मुंडेंचे अभुतपुर्व जल्लोषात होणार स्वागत; उद्या सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा
dhananjay munde
dhananjay munde saam tv

Beed Dhananjay Munde News : "टायगर अभि जिंदा है"..."टायगर इज कमबॅक"...अशी वेगवेगळी श्लोगन वापरून, बीडच्या परळीत धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आलीय. याच फ्लेक्स आणि बॅनरने परळी शहर सजले आहे.

dhananjay munde
Anil Deshmukh : तुरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख प्रथमच आज नागपुरात; सर्वप्रथम ‘येथे’ जाणार

उद्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तब्बल 40 दिवसानंतर परळीत येत असून त्यांचे अभुतपुर्व जल्लोषात जंगी स्वागत होणार आहे. त्याचबरोबर शहरात रॅली काढल्यानंतर सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा देखील होणार आहे.

उद्या धनंजय मुंडे हे हेलिकॉप्टरने गहिनीनाथ गडावर नतमस्तक होतील, दुपारच्या दरम्यान ते परळीत आईंची भेट घेऊन प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत गोपीनाथ गडावर दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर त्यांची ईटके कॉर्नर ते मोंढा मैदान स्वागत रॅली निघणार असून त्यानंतर मोंढा मैदान येथे जाहीर सभा असणार आहे.

dhananjay munde
Sangli News : काँग्रेस आमदारांच्या घरात घुसून गाडीवर दगडफेक; जुन्या भांडणातून नशेखोर तरुणाचे भयंकर कृत्य

दरम्यान आपला नेता परळीत दाखल होत असल्याने मुंडेंच्या चाहत्यांकडून जंगी स्वागताची तयारी सुरू आहे. उद्या कुठं सत्कार तर कुठं पेढे तुला होणार असून याच मुंडेंच्या स्वागतासाठी लावलेल्या, "टायगर अभि जिंदा है...टायगर इज बँक" नावाचे बॅनरची जोरदार चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com