OBC कट ऑफ 485, EWS 450, मग आरक्षणाचा फायदा कोणाला? धनंजय मुंडेंनी आकड्याचं गणित मांडलं

Dhananjay Munde Questions OBC Reservation: धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात एमपीएससी परीक्षेचा निकालाचा कट-ऑफ OBC 485 vs EWS 450 चा हवाला दिला. आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो की हानी, असा प्रश्न त्यांनी केलाय.
Dhananjay Munde Questions OBC Reservation
Dhananjay Munde presenting OBC vs EWS cut-off statistics during his Dasara Melava speech.saam tv
Published On
Summary
  • दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी आरक्षणावर भाष्य केलं.

  • एमपीएससी कट ऑफ आकडेवारीतून ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तुलना केली.

  • ओबीसी आरक्षण विद्यार्थ्यांसाठी तोट्याचं ठरतंय का, असा सवाल उपस्थित केला.

आरक्षण प्रश्नावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. इकतकेच नाही तर त्यांनी ओबीसी आरक्षणाचा हट्ट विद्यार्थ्यांसाठी किती नुकसानकारक असल्याचं उदाहरणासह स्पष्ट करून दिलं. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीची आकडेवारी सर्वांसमोर सांगत त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा झाला की तोटा असा सवाल त्यांनी तरुणांना केला.

Dhananjay Munde Questions OBC Reservation
Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

राजकीय आरोपांमुळे मंत्रिपद गेल्यानं बॅकफूटवर गेलेले धनंजय मुंडे दसऱ्या मेळाव्यात चांगलेच फॉर्मात आले. त्यांनी शेरो शायरी करत आपल्या भाषणाची रंगत वाढवली. त्याचबरोबर त्यांनी थेट आकडेवारी मांडत ओबीसी आरक्षण कसं नुकसानकारक असल्याचं सांगितलं. यंदाच्या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर, तसेच भाजपचे आमदार उपस्थित होते. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.

Dhananjay Munde Questions OBC Reservation
Manoj Jarange: ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के मदत करा, जरांगेंच्या ४ मागण्या

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका. आरक्षण आकडेवारीकडे दुर्लक्ष करून केवळ खुर्चीसाठी सगळे सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीची आकडेवारी मुलांसमोर ठेवत त्यांनी मराठा तरुणांना विशेष आवाहन केलं.

कोणत्याही आरक्षणासाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे. मराठा आरक्षणासाठी आम्हीदेखील प्रयत्न केलेत. काहींना मराठ्यांसाठी ओबीसीमधून आरक्षण हवंय. पण केवळ स्वत:च्या फायद्यासाठी सगळे सुरू असल्याचं म्हणताना धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालाची आकडेवारी सांगितली.

या निकालामध्ये ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ 485 गुणांचा होता. तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा (EWS) कट ऑफ 450 गुणांचा होता. जर मराठा समाजातील उमेदवारांनी EWS मधून परीक्षा दिली असती तर 450 गुणांवर उत्तीर्ण झाले असते. मात्र ओबीसींचे आरक्षण घेऊन संधी मिळाली नाही हे वास्तव आहे. हे असं असताना हे कोणाला फसवताहेत? असा सवाल त्यांनी केलाय. मराठा समाजातील मुलांनी या आकडेवारीकडे डोळसपणे पाहावे, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com