Dhananjay Munde News: अजित पवारांच्या बंडानंतर आज सकाळी छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली. आता धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंडे यांच्या परळ येथील कार्यालयात ५० लाखांची खंडणी देखील मागितल्याचे समेर आलं आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञाताने धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयातील लँडलाईनवर फोन करून धमकी दिल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांना जीव मारण्याची धमकीची सुपारी घेतल्याचं धमकीखोराने म्हटले. जर मरायंचं नसेल तर ५० लाख रुपये द्या, अशी धमकी मुंडे यांना देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याकडून लँडलाईन फोनवरून ५० लाखांची मागणी केली आहे.
याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणारा आणि धनंजय मुंडे यांना धमकी देणारा एकच व्यक्ती असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, धमकी दिल्याची माहिती समजतात कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांनाही त्यांच्या कार्यालयात फोन करून सुपारी मिळाल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर या धमकीची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. रात्रीसाडे अकराच्या सुमारास धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे.
भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी रायगडच्या महाड येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या प्रशांत पाटील याला अटक केली आहे.या तरुणानं मद्यधुंद अवस्थेत ही धमकी दिल्याची पोलिसांनी सांगिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.