CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Assembly Election 2024: महायुतीनं मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूका लढवू असं जरी जाहिर केलं असलं तर भाजप शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे असं दिसंतय.
CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट
CM Eknath Shinde and Devendra FadnavisSaam TV
Published On

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजप पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहे. सत्ता आल्यास एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाला मुकावं लागणार असल्याचं दिसतंय. कारण ज्यांच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असं भाजपनं ठरवल्याची माहिती समोर आलीये. अर्थात भाजपचं शिंदे आणि अजित पवारांना ऐकावं लागणार कारण महायुतीत सध्या तरी भाजपचं मोठा भाऊ आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत निराशा आहे असं दिसतंय.

लोकसभेचा निकाल पाहता महायुतीत शिंदेंचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला होता. त्यामुळे विधानसभेत पुन्हा शिंदेना मुख्यमंत्रीपदासाठी कौल मिळू शकतो असं दिसत असतांना अमित शाहांनी शिंदेंना त्यागाची आठवण करुन दिली.

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट
Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

२०१९ ला शिवसेना १२४ जागांवर लढली परंतू 2024 ला बाळासाहेबांची शिवसेना म्हणणाऱ्या भाजपनं शिंदेंची केवळ 80 जागांवरच बोळवण केल्याचं दिसतंय. तर लोकसभेत 28 जागा लढवून केवळ ९ जागा जिंकणाऱ्या भाजपनं यंदा विधानसभेला थेट 160 पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरु केलीये.

लोकसभा असो की विधानसभा भाजपनं मित्रपक्षांना आपल्या मर्जीप्रमाणे जागावाटप केलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी कमी जागा लढवून भाजपपेक्षा अधिक जागा मिळवणं हे खरं आव्हान शिंदेंसमोर असणार आहे.

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट
MNS Candidate Sixth List: मनसेची सहावी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळालं तिकीट? वाचा...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महायुतीनं घोषित केलेला नाही. म्हणून निकालानंतर जर जास्त जागा आल्या तर भाजप पुन्हा त्यागाची आणि जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री या सुत्राची आठवण करुन देणार हे निश्चित आहे. त्यामुळेच महायुतीचा विजय झाला तर शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यंमत्रीपदावर बसवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com