Devendra Fadnavis : अयोध्येला कारसेवेला गेल्याचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी केला शेअर, विरोधकांच्या टीकेला उत्तर

Devendra Fadnavis News : नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. नागपुरातील एका वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटो प्रकाशित झाला होता.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam tv
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा 'कारसेवकांनी' बाबरीची ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर संशय व्यक्त करत टीका केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा पुराचा आता सादर केला आहे.

नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. नागपुरातील एका वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटो प्रकाशित झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राचे देखील आभार मानले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis
Ram Mandir: अखेर वादावर पडदा! उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं

देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'जुनी आठवण... नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठवले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे... नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.' (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत आता 'या' लोकांना आणि वाहनांना नो एन्ट्री; सुरक्षेसाठी २० हजार जवान तैनात

काय म्हणाले होते फडणवीस?

मी कारसेवक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा बाबरीचा ढाचा पाडला तेव्हाही मी तिथे होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते, असं देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com