Devendra Fadnavis On Nagpur Violence Updates : नागपूरच्या महल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांकडून जमावला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. औरंगाजेबाच्या कबरीवरून दोन गटात राडा झाला, त्यानंतर हिंसाचार उफळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नागपूरकरांना शांततेचे आवाहन करण्यात आलेय.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांतता निर्माण करण्यासाठी पोलिस आयुक्तांना जे काही कठोर पावले उचलली पाहिजेत ती उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दंगल -तटबंदी आणि दगड -पेलिंगविरूद्ध काटेकोरपणे कारवाई करावी, अशी सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपूरकरांनी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलेय. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे.सहकार्यशील शहर आहे. आशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांततेचे आवाहन केलेय.
नागपूरमधील महाल भागात सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. दंगलीनंतर नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. पोलिसांनी आथापर्यंत ८० जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.