राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. राज्यातील मोठ्या महापालिकांप्रमाणेच छोट्या म्हणजेच ड वर्ग महापालिकांमध्येही आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. तर दुसरीकडे मुख्याधिकारी किंवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागानं घेतलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलय. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला कारण ठरलंय वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने केलेली कारवाई आणि मिरा-भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडीमार्फत झालेली चौकशी..
शिंदे-फडवणीसांमध्ये याआधीही अनेक कारणावरून वादाची ठिणगी पडलीय.
शिंदे-फडणवीसांमध्ये कोणत्या कारणांवरून मतभेद?
18 जानेवारी
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तिला स्थगिती देण्यात आली.
6 फेब्रुवारी
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक परिवहनमंत्री असताना वाहतूक सचिवांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
7 फेब्रुवारी
ठाण्यातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांचं वक्तव्य
9 फेब्रुवारी
आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलं
16 फेब्रुवारी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अस्तित्वात असतानाही
एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची घोषणा
17 फेब्रुवारी
मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढण्यात आली
या सगळ्या घटना पाहता शिंदे फडणवीसांमध्ये काहीच आलबेल नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यात आता ड वर्ग महापालिकांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा नव्या वादाच्या चर्चेला फोडणी मिळालीय हे मात्र निश्चित....
फडणवीस-शिंदे शीतयुद्ध पेटणार?
महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्तीवरून पेच?
अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत मुख्यमंत्र्यांचे नगरविकास विभागाला आदेश
शिंदे-फडणवीसांमध्ये कोणत्या कारणांवरून मतभेद?
18 जानेवारी
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तिला स्थगिती
6 फेब्रुवारी
शिवसेना नेते प्रताप सरनाईक परिवहनमंत्री असताना वाहतूक सचिवांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
7 फेब्रुवारी
ठाण्यातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांचं वक्तव्य
9 फेब्रुवारी
आपत्ती व्यवस्थान समितीतून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलं
16 फेब्रुवारी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष असताना
शिंदेंकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची घोषणा
17 फेब्रुवारी
मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची वाय प्लज दर्जाची सुरक्षा काढण्यात आली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.