भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी उपमहापौरांचे आत्मक्लेश आंदोलन

कै. यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलनास सुरवात
भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी  उपमहापौरांचे आत्मक्लेश आंदोलन
भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी उपमहापौरांचे आत्मक्लेश आंदोलनविश्वभुषण लिमये
Published On

सोलापूर - नगर सचिवाच्या दिशेने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याची बाटली फेकणारे भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळा समोर धरणे देत आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत मिळत नसल्याच्या रागातून भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी डायसच्या दिशेने पाण्याची बाटली फेकली होती. त्या निषेधार्थ भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलनास सुरवात केली असून पालिका आयुक्तांनी नगरसेवक पाटील वर गुन्हा दाखल करावा अन्यथा कोर्टातून नगरसेवक सुरेश पाटील वर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा उपमहापौर काळे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com