प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ठाकरे सेनेकडून काटेचे फोटो पोस्ट

BJP Worker Behind Ink Attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं... मात्र गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे? आणि त्याच्या मागे कुणाचा हात आहे? पाहूयात....
Deepak Kate seen with BJP leader Chandrashekhar Bawankule – Photo shared by Sushma Andhare
Deepak Kate seen with BJP leader Chandrashekhar Bawankule – Photo shared by Sushma AndhareSaam Tv
Published On

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण चांगलंच तापलंय.. गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाऊंडेशनच्या दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.... मात्र गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे? पाहूयात...

कोण आहे दीपक काटे?

पुण्यातील इंदापूरच्या सराटी गावचा रहिवासी

शेताच्या बांधाच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाची हत्या

चुलत भावाच्या हत्या प्रकरणात 7 वर्षे येरवडा तुरुंगात

जेलमधून बाहेर आल्यानंतर आता इंदापुरात वास्तव्य

पिस्तुल, काडतुसं बाळगल्याप्रकरणी पुणे विमानतळावर अटक

दुसरीकडे सुषमा अंधारेंनी गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेचे चंद्रशेखर बावनकुळेसोबतचे फोटोच पोस्ट केलेत.... तर याच फोटोचा संदर्भ देत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय..तर बावनकुळेंनी मात्र दीपक काटेसोबतच्या संबंधाबाबत हात झटकलेत...

खरं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे नागरी सत्कार सोहळ्यासाठी गेले होते.. मात्र यावेळी शिवधर्म फाऊंडेशनच्या दीपक काटेसह साथीदारांनी गायकवाड यांना काळं फासलं... तर संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थांचाही एकेरी उल्लेख केल्याचा आरोप शिवधर्म संघटनेने केलाय...मात्र दीपक काटेनेच हा हल्ला केला आहे की? त्याचा मास्टरमाईंड वेगळाच आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com